Press "Enter" to skip to content

अंतोरे उपसरपंचपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील अंतोरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत वामन पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच तथा अध्यासीय अधिकारी अमित पाटील यांनी जाहीर केले.दि.१८ जून रोजी ग्रामपंचायत अंतोरे येथे उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली यावेळी या पदाकरीता प्रशांत पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

यावेळी सदस्य राजेश कांबळे, जमिला दिवडे, मेघा पाटील, आशा म्हात्रे, हिराबाई पाटील, प्रगती पाटील, ग्रामसेवक प्रविण पाटील आदिंसह ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.