Press "Enter" to skip to content

तात्यासाहेब टके यांच्या पुण्यतिथी निमित्त खा.सुनिल तटकरे यांनी घेतले दर्शन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठणे येथील तत्कालीन जेष्ठ समाजसेवक कै. तात्यासाहेब टके यांची विसावी पुण्यतिथी शुक्रवार दि. १८ जून रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात भाई टके व हरिष टके परिवाराकडून साजरी करण्यात आली. कै. तात्यासाहेब टके व कै. रुख्मिणी पांडुरंग टके यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन कै. तात्यासाहेब टके व कै. रुख्मिणी टके यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, हरिषशेठ काळे, हरिष टके, गजानन खराडे, बाळासाहेब टके, जयवंत गायकर, बिपीन सोष्टे, सुधीर नायर, विभूती महापात्रा, गुड्डु मोदी, धृव सोष्टे, मनोज टके, चेतन टके, पंकज टके, जयेश टके, मोरेश्वर संगणे आदी उपस्थित होते.

कै. तात्यासाहेब टके व कै. रुख्मिणी टके यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी ९ ते ११ दरम्यान मेढा येथील भटजी शैलेश जंगम यांनी मातृपितृ पुण्यस्मरण विधी अत्यंत विधीपूर्ण पद्धतीने केली त्यानंतर दुपारी ११ ते १२ या दरम्यान आमडोशी येथील गजानन महाराज बालकावडे यांचे श्रवणीय प्रवचन संपन्न झाले त्यानंतर नागोठणे गवळआळी येथील प्रसिद्ध गायक गीतकार अशोक भंडारे यांनी कै. तात्यासाहेब टके यांची आठवणपर गीत गाऊन कार्यक्रमांची शोभा वाढविली.

या भक्तिमय कार्यक्रमांस राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, डॉ. राजेंद्र धात्रक, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, भोईर गुरुजी, प्रकाशशेठ जैन, अनिलशेठ काळे, दिलीप शहासने, नाना तेरडे, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, विनय गोळे, पाटणसई ग्रा.पं. सदस्य सचिन कळसकर, नागोठणे ग्रा.पं. सदस्य अकलाख पानसरे, रोशन पारंगे, सिराजभाई पानसरे, अजय साळुंखे, काशिनाथ दाभाडे, मंगेश तेरडे, प्रविण जैन, शैलेश रावकर, विक्रांत घासे, विकास मेस्त्री, केशव भोसले, संजय कामथे, संजय टके, विजय टके, जितेंद्र जाधव, गोटया राजीवले, रवि बामणे, प्रकाश मेस्त्री, अमित मोरे
संकेत साळुंखे, सिद्देश महाडिक
आदींसह टके परिवारातील सर्वजण उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.