Press "Enter" to skip to content

शेततळे योजनेच्या लाभापासून नागोठणे विभागातील शेतकरी वंचित

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

“मागेल त्याला शेततळे” या शासनाच्या योजनेनुसार रोहा तालुक्यातील वीस शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी बांधली. त्यातील फक्त्त सात शेतकऱ्यांना योजनेचे पैसे देण्यात आले परंतु उर्वरित शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळालेच नाहीत. ही योजना राबवून दोन वर्ष उलटले तरी आम्हाला योजनेचे पैसे मिळाले नाहीत. रोहा कृषी कार्यालयात सतत पाठपुरावा करून सुद्धा काही उपयोग झाला नसल्याचे नागोठणे जवळील आंबेघर येथील शेतकरी रोशन पारंगे यांनी पत्रकारांना सांगितले.

याच दरम्यान याबाबत आम्ही शेतकरी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना भेटलो त्यानंतर खासदार तटकरे यांनी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधून शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळवून द्या अशा सूचना केल्यानंतर सात शेतकऱ्यांना पैसे मिळाले परंतु आम्ही उर्वरित सतरा शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नसल्याचे रोशन पारंगे यांनी सांगितले.

याबाबत रोहा तालुका कृषिअधिकारी के. जे. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शासनाकडून या योजनेतील जो निधी आला त्या निधीतून फक्त्त सात शेतकऱ्यांना पैसे देता आले आहेत. तसेच शासनाकडून या योजनेसाठी अधिक निधी उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना पैसे दिले जातील असे के. जे. जाधव यांनी शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.