सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
एकिकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट.या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.त्यातच प्रत्येकाची स्थिती उत्तम असते असे नाही.ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब कुटूंबाना हक्काचा आधार देणारे आॅल इंडिया पोलिस जनसेवा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आपटा येथील गणेश दिलीप थोरवे यांचा वाढदिवस ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील मोठा आनंदाचा दिवस, प्रत्येक जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.परंतु कोरोना पाश्र्वभूमीवर वाढदिवस थाटामाटात न करता गणेश थोरवे यांनी विविध उपक्रम राबवून साधेपणाने साजरा केला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपटा आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकांना कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कोरोना पाश्र्वभूमीवर आरोग्यसेवकांच्या कामाची गणेश थोरवे यांनी दखल घेऊन त्यांना कोरोना योध्दाने सन्मानित केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.








Be First to Comment