सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची पुण्यतिथी व राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना वाफ घेण्याची मशीन आणि मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील,खालापूर तालुका अध्यक्षा हेमाताई चिंबुळकर,माजीतालुका उपाध्यक्ष महेंद्रदादा नीगुडकर,माजी नगरसेवक धनंजय दुर्गे,शहर अध्यक्ष समीरदादा चव्हाण,नगरसेवक हेमंत दादा ठाणगे यांच्या मार्गदर्शनाने मनसे महिला सेना आकांक्षा सावंत शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
याप्रसंगी समीरदादा चव्हाण,कर्जत शहर उपाध्यक्ष रांकित शर्माकर्जत शहर उपाध्यक्ष राजेश साळुंखे, शरद थथमहेश लोवंशी, कस्तुरीताई ठाणगे आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर शवपर्यवेक्षिकारजनीताई सोनावणे व पर्यवेक्षिका संगीताताई भगत,आंगणवाडी सेविका व मनसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment