Press "Enter" to skip to content

शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत मध्ये वृक्षारोपण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

शिवसेनेच्यावर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत शहराच्या टेकडीवर 55 वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टेकडीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून, मास्क आणि सॅनिटायजर सोबत ठेवूनच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माझी वसुंधरा संकल्पनेतून झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगरसेविका प्राची डेरवणकर, शहरप्रमुख भालचंद्र जोशी, ज्येष्ठ शिवसैनिक मोहन ओसवाल, दर्शन वायकर ,फरहान चौगुले, अभिजीत मोधळकर, सुरेश भरकले, नाना कर्णूक, मीना कुलकर्णी, शहर संपर्क संघटिका सायली शहासने, सामिया चौगुले, निसर्गप्रेमी विष्णू भोईर,वैभव सुरावकर, रितेश वायकर, शकील शेख, केतन जोशी आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.