सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गाव तिथे रस्ता हे समीकरण दिवसेंदिवस आता निर्माण झाले.गावामध्ये चांगले रस्ते असावे.शिवाय कोरोनांच्या काळात आपण किती स्वच्छता मार्ग अवलंबतो या माध्यमातून दिसत असते.आपल्या गावातील रस्ते चांगले असावे.मात्र लोहोप गावातील असलेले अंर्तगत रस्त्याची दुर्वस्था निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी नवि रस्ते बांधण्याचा संकल्प घेण्यात आले.जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जन सुविधा या योजनेच्या माध्यमातून आणी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांने आज या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला.
गेले अनेक महिने या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नव्हते, अखेर जन सुविधा योजनेच्या माध्यमातून या कामाला मुहुर्त मिळाला गावाचे रस्ते उत्तम प्रकारे असले तर ख-या अर्थाने गावाचे महत्व समजते.यावेळी या रस्त्याच्या कामाचे उदघाटन ,रामदास भाई ठोबरे – भाजप खालापुर तालुका अध्यक्ष ,किशोर देवघरे – भाजप खालापूर ता.उप.अध्यक्ष, संदिप पाटील – वडगाव जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष ,पल्लवि देवघरे – सरपंच ईसांबे ,गृप ग्राम पंचायत देविदास पाटील वडगाव पंचायत समिती अध्यक्ष, आंनता पाटील उप सरपंच, रेश्मा पाटील सदस्य ,विजय नळावडे – ग्रामसेवक .अतुळ शेलार .मोहन पाटील ,शिवाजी पाटील, महेश पाटील.भरत पाटील उपस्थित होते.








Be First to Comment