पेण तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग पाटील यांचे दुःखद निधन
सिटी बेल | पेण |
पेण तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे.१६ जून रोजी हृदयविाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.मृत्युसमयी त्यांचे वय ७६ वर्षे होते.
चंद्रकांत पाटील हे मूळचे पेण तालुक्यातील कळवे गावचे रहिवासी होते. पेण तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी बजावली होती. कुशल संघटक म्हणून त्यांच्या नावाचा दबदबा होता. न्यू मेरिटाइम जनरल कामगार संघटनेचे सचिव वैभव पाटील यांचे ते पिताश्री.
स्वर्गीय चंद्रकांत पाटील यांचे दशविधी कार्य गुरुवार दिनांक २५ जून रोजी संपन्न होणार असून उत्तरकार्य सोमवार दिनांक २८ जून रोजी कळवे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास सद्गती प्रदान करो. पाटील कुटुंबियांच्या दुःखात सिटी बिल वृत्तसमूह सहभागी आहे.









Be First to Comment