Press "Enter" to skip to content

पत्रकार उदय मोरे यांना आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहिर


सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील मेढे गावचे सुपुत्र व नवनिर्वाचित उपसरपंच,रायगड भुषण जेष्ठ पत्रकार उदय मोरे यांच्या सामाजिक तथा अन्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराज्य सामाजिक पुरस्कार जाहिर झाला आहे.

नँशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊण्डेशन
हेल्थ अँड नँचरल डेव्हलपमेंट सोसा.रजि.बेलगाव यांच्या
वतीने सदरचा पुरस्कार जाहिर झाला असून ३० आँगस्ट रोजी आदर्श हायस्कूल व ज्युनि.काँलेज वडगाव-बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात येणार आहे.कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मान्यवरांना दरवर्षी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या कार्यक्रमास तिन्ही राज्यातील सैन्य दलातील अधिकारी,सिने कलाकार,शिक्षणाधिकारी,राजकीय नेते व मठाधिपती आदी मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार, विशेष सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व मानाचा म्हैसूर फेटा प्रदान करुन पुरस्कार्थीच्या सन्मान केला जाणार आहे.

उपसरपंच तथा रायगड भूषण जेष्ठ पत्रकार उदय मोरे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरुण मंडळ मेढे यांचासह रा.जि.व रोहे प्रेस क्लब यांच्यासह अन्य पत्रकार मित्र,तालुका कुणबी समाज, जय भवानी पतसंस्था,अवचितगड प्रतिष्ठान आदींसह समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.