सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी येथील तुराडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नुकताच रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच चंद्रकांत भोईर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेली निवडणूक अधिकारी म्हणून अस्मिता मोकळ यांनी काम पाहिले.
यावेळी विश्वनाथ वामन गायकवाड यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला.यावेली विश्वनाथ गायकवाड यांच्या विरोधात इतर कोणाही सदस्याने अर्ज न भरल्याने निवडणूक अधिकारी अस्मिता मोकल यांनी विश्वनाथ गायकवाड यांची तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

उपसरपंचपदी विश्वनाथ गायकवाड यांची निवड झाल्याचे समजताच चाहत्यांनी समाधान व्यक्त केले.सर्वप्रथम सरपंच चंद्रकांत भोईर यांनी विश्वनाथ गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना उपसरपंच पदाच्या खुर्चीवर आसनस्थ करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊ दत्तू ठाकूर, प्रतिभा कोणकर, गुरुबाई राठोड, नंदिनीताई आठपाडकर, हरीश पाठारे, आंबे महादु दोरे, मावळत्या उपसरपंच शितल माळी, माजी उपसरपंच मनोहर चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते काका गायकवाड, भानुदास गायकवाड, नाना गायकवाड, रोहिदास कांबळे, भानुदास गायकवाड , ज्ञानेश्वर शिंदे, महादू दोरे, अशोक सोनवणे, काशिनाथ खुडे, दिलीप खुडे, युवा कार्यकर्ते संदीप गायकवाड, राजू वडगेरे राजू जाधव महिला कार्यकर्त्या माजी सरपंच रुक्मिणी गायकवाड, सीताबाई बडगिरे, अनुसया राठोड आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment