Press "Enter" to skip to content

मोहोपाडा शिवभोजन केंद्रावर छत्र्या आणि मोफत शिवभोजन थाळीचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

एकिकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट.या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.त्यातच प्रत्येकाची स्थिती उत्तम असते असे नाही.ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब कुटूंबाना आधार म्हणून रसायनी येथील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा शिवभोजन केंद्रावर गरजू व गोरगरीबांना पाचशे छत्र्या आणि मोफत शिवभोजन थालीचे वाटप करून वाढदीवस साजरा करण्यात आला.

शिवसैनिकांनी अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने गोरगरीब जनतेला धत्र्या व मोफत शिवभोजन दिल्याने समाधान मिळाले. यावेळी शिवभोजन थाली केंद्रावर विभागप्रमुख अजित सावंत,माजी सभापती रमेश पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे,माजी सरपंच निलम पाटील,माजी उपसरपंच सदगुणा पाटील,माजी उपसभापती गजानन मांडे,उपविभागप्रमुख कृष्णा पाटील,माजी उपसरपंच दत्तात्रेय काने,प्रिती कडव,जेष्ठ नेते सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षी पाटील,शाखाप्रमुख मंगेश पाटील , शशिकांत भंडारकर,संतोष पांगत आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.