Press "Enter" to skip to content

मनसेकडून राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात “मनसेची साथ-एक मदतीचा हात” या घोषवाक्याला अनुसरून मनसे महिला आघाडी तालुका अध्यक्षा हेमाताई चिंबुलकर यांच्या वतीने गरजू व गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तूं ,मास्क व सॅनिटायझरचे वाटप कार्यक्रम पार पडला.

यावेळी मुंबई पुणे जुना महामार्गांवर रस्ता दुभाजकावर मनसे ध्वज फडकविण्यात आला.तसेच रिक्षा चालक बंधूसोबत राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.त्यानंतर खालापूर फाटा येथे सर्वसामान्य जनतेला मास्क वाटप करण्यात आले आणि खालापूर फाटा येथील मनसेच्या झेंड्याचे नूतनीकरण करण्यात आले.

यावेळी मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जे.पी.पाटील ,तालुका अध्यक्ष सचिन कर्नुक ,मनसे राज्य उपाध्यक्ष अभिषेक दर्गे ,खालापूर शहर अध्यक्ष कौस्तुभ जोशी ,जेष्ठ मनसैनिक नानु सावंत, सावरोली शाखा अध्यक्ष दत्ता मिरगल, मनसे सैनिक मंदार जोशी ,अजिंक्य जोशी,अजिंक्य चव्हाण,प्रथमेश पंडित, प्रतीक लोखंडे व इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.