सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी परिसरातील वावेघर येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांच्या प्रयत्नातून वावेघर येथे मनसे शाखेचे उदघाटन व नामफलकाचे अनावरण करण्यात आले.मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वावेघर थांब्याजवल हा कार्यक्रम पार पडला.
सर्वप्रथम वावेघर थांब्याजवलील शिवप्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी मनसे पदाधिकारी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुलजी भगत, जिल्हा सचिव केशरीनाथ पाटील,पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, पनवेल तालुका उपाध्यक्ष संदेश भगत,खालापुर तालुका सचीव अभिजीत घरत,पंचायत समिती वासांबे विभाग अध्यक्ष फुलचंद लोंढे,गुळसुंदा शाखा अध्यक्ष निखील पाटील,शाखा उपाध्यक्ष मंदार जाधव , जितेंद्र चव्हाण,विशाल निंबाळकर,संजय पाटील,कृष्णा झोंबाडे इत्यादी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी परीसरातील काही तरुणांनी मनसेत पक्षप्रवेश केला. त्याचप्रमाणे वावेघर मनसे शाखेचे पदाधिकारी शाखा अध्यक्ष- रशिद शेख, शाखा उपाध्यक्ष- शेखर माने, सचीव- अर्जुन चव्हाण,गोविंद पवार,जितू केदारी, संतोष माने, लतिफ शेख, शाम कुराडे, अंजल धोत्रे, चेतन धोत्रे, राकेश शिंदे,आकाश कांबळे,सिध्दार्थ पवार,ललकार सरोदे
अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवली.








Be First to Comment