रायगड जिल्ह्यातील वाली पंचक्रोशी येथील जेष्ठ समाजसेवक, आंबेडकरी चळवळीतील अष्टपैलू नेतृत्व
सिटी बेल | मेढा | उदय मोरे |
रोहा तालुक्यातील वाली-गौतमीनगरचे सुपुत्र ३५-४० वर्षापासून सामाजिक, धार्मीक, शैक्षणिक, राजकीय अश्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे जेष्ठ समाजसेवक कालकथित बाळाराम चंद्रकांत शिर्के यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६८ व्या वर्षी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात अकस्मित दुःखद निधन झाले.
खणखणीत आवाज, प्रेमळ शब्दांची संजीवनी, स्पष्टवक्ता, उत्कृष्ट भाषण शैली, राजकीय, सामाजिक, धार्मीक, शैक्षणीक क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची रायगड जिल्हात ओळख होती. अनेक समाजपयोगी कार्य त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली आहेत. तसेच समाज भूषण, समाज रत्न अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते. आपल्या सुमधुर सम्यक वाणीने, व आपुलकीने हजारो लोकांना त्यांनी आपलेसे केले होते. माणसे जोडणे हा जणू त्याचा छंदच होता. ज्याप्रमाणे त्यांनी माणसांवर प्रेम केले, माणसे जोडली त्याचप्रमाणे त्यांनी प्राणीमात्रांवर-जनावरांवर देखील तेवढेच प्रेम केले. ते एक अत्यंत कष्टाळू शेतकरी होते. अहोरात्र मेहनत घेऊन आपली शेतीची मशागत करत असत. खिल्लार बैल जोडीचे अत्यंत प्रेमी, प्राण्यांच्या बाबतीतही तेवढाच जिव्हाळा त्यांना होता, अतिशय मेहनतीने त्यांचे पालन-पोषण करत होते. आता ते सगळेच पोरके झाले आहेत ह्याची मात्र खंत आहे.
आपल्या मायाळू भाषा शैलीतुन ते लहान-थोरांजवळ संवाद साधत असतं. त्यांच्या ह्याच देहबोलीतून ते सर्व समाजातील जनमाणसात लोकप्रिय होते. त्यांच्या अकस्मित निधनाने शिर्के कुटूंबियाची तसेच वाली पंचक्रोशीची न भरुन निघणारी हानी झाली आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात एक भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अशा या जेष्ठ समाजसेवकाचा शेवटचा आदरांजली कार्यक्रम रविवार दि.१३-जून-२०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता, मु. वाली, ता.रोहा, जि. रायगड येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या कुटूंबियांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. कालकथित बाळाराम चंद्रकांत शिर्के यांना भावपुर्ण आदरांजली..!








Be First to Comment