सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
मनसेचे पदाधिकारी संदेश ठाकूर यांच्या मातोश्री व दिवंगत माजी पंचायत समिती सदस्य बा. सो. ठाकूर गुरुजी यांच्या पत्नी सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती ज्योतीप्रभा ठाकूर यांचे वयाच्या ७४ वर्षी अल्पशा आजारांनी निधन झाले आहे.
त्यांच्यावर उरण बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि. २५ जून रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर येथे सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. तर दिवसकार्य रविवार दि. २७ जून रोजी रहात्या घरी नयन अपार्टमेंट, उरण बाजारपेठ येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारले जाणार नसल्याचे ठाकूर कुटूंबियांनी सांगितले.








Be First to Comment