माणगाव सत्र न्यायालयात महत्त्वपूर्ण कामगिरी, आदिवासी महिलेला मिळवून दिला न्याय : आरोपीस सुनावली जन्मठेप
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
म्हसळा तालुक्यातील एका आदिवासी महिलेवर अत्याचार झाला होता या पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी माणगाव सत्र न्यायालयातील अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ऍड. योगेश तेंडुलकर यांनी चांगल्या प्रकारे युक्तिवाद घडून आणला त्यांच्या या अभ्यासपुर्ण युक्तिवादा आणि पीडिटेवर झालेला अन्याविरोधात तिला न्याय मिळावा म्हणून चांगले प्रयत्न करत सदर आदिवासी महिलेला न्याय मिळवून देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
त्यांनी एका गरीब कुटूंबातील आदिवासी महिलेला न्याय मिळवून दिले त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल आदिवासी समाजाच्या माणगाव रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला, या प्रसंगी आदिवासी युवा सामाजिक कार्यकर्ते भिवा पवार, तळा तालुका आदिवासी संघटना संघटक, परशुराम पवार, दक्षिण रायगड कातकरी युवक अध्यक्ष उमेश जाधव, सचिव संतोष वाघमारे भिरा, संजय कोळी निजामपूर, धर्मराज कोळी सर, गोविंद पवार सर, तळा तालुक्यातील बाळाराम पवार, यशवंत धोंडू जाधव, नथुराम मुकण, चंदर पवार, बंडू कोळी, माणगाव नाईटणे गावचे अध्यक्ष नामदेव जाधव कृष्णा वाघमारे राजा पवार चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
सदर या पीडित महिलेला मिळालेल्या न्यायामुळे आमचा आदिवासी समाज बांधवांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळावला असल्याचे तळा तालुका आदिवासी संघटनेचे संघटक परशुराम पवार यांनी सांगितले .








Be First to Comment