Press "Enter" to skip to content

कोरोनामुळे लग्नात ना गाजावाजा ना बेंडबाजा

कोरोनाच्या सावटामुळे घोडे व्यवसायीक अडचणीत

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने मागिल दोन वर्षांपासून अनेक समारंभाना नियम जारी केले आहेत.त्यातच लग्न समारंभासाठी 25 माणसांची परवानगी दिली असून कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षितता पाळूने गरजेचे आहे.मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्स याचा वापर करणे बंधनकारक असल्याने त्यामुळे दोन वर्षांपूर्वी होणारे लग्न समारंभ आता लोप पावत चालले आहे‌.आताच्या लग्नसराईत ना कोणता गाजावाजा ना बेंडबाजा अशी अवस्था होऊन राहिली असतांनाच या कोरोनाच्या सावटाखाली मात्र घोडे व्यवसायीक अडचणीत आले आहेत.

लग्नसमारंभासाठी मर्यादित पाहुणे बोलवावे लागत असल्याने पत्रिका छापण्याचा खर्च कमी झाला तर
त्याच बरोबर उभारण्यात येणारे भव्यदिव्य मंडप, लाईटिंग, केटरर्स वाले, ब्युटी पार्लर, बॅंन्डवालेे, घोडेवाले या सर्व व्य्यावसायिकांना आता घरघर लागली आहे.यासह अनेक समारंभावर शासनाने निर्बंध आणल्याने अनेक व्यावसायिििक अडचणीत आले आहे.तर नवरा नवरीला ने – आण करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्यावर सुद्धा कोरोनाची संक्रांत आली आहे.

या सर्व गोष्टींच्या पलीकडे प्रत्येक समारंभात लागतो तो घोडा लग्न, वरात, मिरवणूक, मुंज, यात्रा, उरुस यासह अनेक समारंभासाठी घोडे व्यवसायीकांची चलती असते मात्र मागील दोन वर्षांपासून हे घोडे व्यवसायीक अडचणीत आले आहेत.पेण तालुक्यातील अंतोरे येथे मागील 60 वर्षापासून घोड्यांचे व्यवसाय करणारे अलिमिय्या अहमदमिय्या बेमजी यांचे कुटुंबांची तिसरी पिढी या घोडे व्यवसायात आहेत मात्र या कोरोनामुळे शासनाने लाॅकडाऊनसह अनेक समारंभांवर निर्बंध आणल्यामुळे मोठी उपासमारीची वेळ आली आहे.

घोड्यांचा व्यवसाय करतांना त्यांची मोठ्या प्रमाणावर काळजी तसेच त्यांची वेळोवेळी निघा राखली जाते त्यांना करबा, गव्हाचा भुसा, चणे, सुका गवत हे घोड्यांचे खाद्य असल्याने त्यांना वेळच्यावेळी देणे गरजेचे आहे मात्र या खाद्यांच्या किंमती वाढल्यामुळे आणि आता व्यवसायच ठप्प झाल्यामुळे घोडे व्यवसायीक या अडचणींचा सामाना करीत आहे त्यामुळे शासनाने अशा घोडे व्यवसायीकांना अर्थीक मदत द्यावी अशी मागणी ते करीत आहेत.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून घोडे व्यवसायावर परिणाम झाला असून रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आमचे घोडे समारंभासाठी जात होते लग्न सराईत 8 ते 10 हजार रुपयांची ऑडर मारली जात होती कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने सर्व समारंभांवर निर्बंध आणले असल्याने आता साध्या पद्धतीने समारंभ साजरे होत असले तरी घोड्यांची काळजी घेतली जाते त्यांचा खाद्यांमध्ये भाव वाढ झाली आहे गव्हाचा एक पोता 1 हजार रुपये तर करबा भोद 1300 रुपयांना मिळत असल्याने व्यवसाय करने आता जिकिरीचे झाले आहे.

अलिमिय्या अहमदमिय्या बेमजी – घोडे व्यवसायीक अंतोरे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.