कामे चांगल्या दर्जाची करा अन्यथा कारवाईला सामोरे जा.. दिला ठेकेदाराना दम !
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
मुबंई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामांचा ठेकेदारांकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची व त्यास होत असलेली दिरंगाई या बाबत खरपूस समाचार घेत खा सुनील तटकरे यांनी पाहणी केली तसेच केली जात असलेली कामे चांगल्या दर्जाची करा नागरिकांच्या समस्या सोडवा अन्यथा कारवाहिला सामोरे जा असा दम दिला .
रायगड चे खासदार सुनील तटकरे यांनी १४ जून रोजी मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड, गोवे, पुई, मुठवली, खांब, वाकन, नागोठणे सह महामार्गावरील केलेल्या कामांची पाहिणी केली तसेच मार्गालगत असलेल्या ग्रामस्थांच्या वेळोवेळी होत असलेल्या तक्रारींचे निवारण करत केलेले काम तर काही जागेवर होत असलेली दिरंगाई या कामांचा खरपूस समाचार घेत संबधित ठेकेदाराना धारेवर धरत चौपदरीकरणाचा होणारा पुढील काम अधिक चांगल्या पद्धतीने करावा ,तसेच येणाऱ्या काळात जर का या समस्या सुटल्या नाहीत तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल परंतु मी स्वतः जनतेच्या सोबत असेन असा सज्जड दम सदरील ठेकेदाराना दिला आहे .
मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरनाच्या कामात वडखळ नागोठणे कोलाड इंदापूर या दरम्यान केलेली कामे ही अत्यन्त निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून येत आहेत पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहेत तर दिरंगाईमुळे आपघात देखील घडले आहेत तसेच कोलाड कुंडलिका नदीपात्रावरील पूल मागील दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला केला गेला मात्र याचे तीन तेरा वाजले दर आठवड्यात त्याची दुरुस्थीचे काम करतात पुलाच्या मधोमध भला मोठा खड्डा व त्यातील लोखंडी सल्या बाहेर आल्या आहेत तसेच पुई नजीकचा महिसदरा नदीपात्रावरील पुलाचे काम गेली दोन वर्षांपासून धीम्या गतीत तर गोवे ग्रामस्थांच्या रस्त्याचे काम अर्धवट खांब येथे बांधलेल्या उड्डाण पुलाला पाझर फुटल्याने पुलाखाली होत असलेला पाण्याचा तलाव यामुळे या खालून वाहन चालवताना अवघड होतं आहे तर सर्व्हिस मार्ग देखील धोकादायक बनला या उड्डाण पुलामुले समोरील येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातास कारण ठरत आहे तर मुठवली गावाला जोडला गेलेल्या मार्गाला ग्रामस्थांना जाण्यासाठी डिव्हाडरची व्यवस्था आशा एक ना अनेक काही मार्गलगलगतच्या ग्रामस्थांची गैरसोयी व तक्रारी समस्या तसेच रखडलेल्या कामांची पाहणी खासदार सुनील तटकरेंनी केली .
यावेळी रस्ते विभागाचे सर्व अधिकारी तसेच खांब विभागीय जेष्ठ नेते रामचंद्रजी चितळकर,आहे आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच श्रीकांत चव्हाण, युवा नेते तथा गोवे ग्राम पंचायत सरपंच महेंद्रशेठ पोटफोडे, रामशेठ कापसे, मनोज शिर्के, नरेंद्रशेठ जाधव,संदीप जाधव, प्रवीण पवार, राजेंद्र जाधव,भाऊ कापसे,अशोक धामणसे, विभागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदररील नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी असतील तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर रस्ते विभागाचे देसाई तसेच त्यांचे इतर सहकारी असतील यांना चौपदरीकरणाचा होणारा पुढील काम अधिक चांगल्या पद्धतीने करावा ,तसेच येणाऱ्या काळात जर का या समस्या सुटल्या नाहीत तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल कडक शब्दात खासदार यांनी दम दिला.








Be First to Comment