Press "Enter" to skip to content

मनसेचे अविनाश पडवळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी

रसायनीतील पत्रकार बंधू व ट्रॅफिक पोलीसांना रेनकोटचे वाटप !

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रसायनी विभागात कोरोना काळात फ्रंट लाईन व्हॉरियर असलेले रसायनी येथील पत्रकार बंधू व ट्रॅफिक पोलीस बंधू यांना मनसे पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात फ्रंट लाईन व्हॉरियर हे जनतेला माहिती मिळावी याकरीता आपल्या जिवाची बाजी लावून सत्य माहीत जनतेपर्यत पोहचविण्याचे कार्य करत असतात तर ट्रॕफीक पोलीस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत असताता.पावसाल्याला सूरूवात झालेली असल्यामुळे अविनाश पडवळ यांनी राजसाहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने रसायनी येथील पत्रकार बंधू व ट्रॅफिक पोलीस बंधू यांना कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर फिरावे लागते याची दखल घेऊन पावसापासून संरक्षण होण्यासाठी पत्रकार व पोलीस बांधवाना रेनकोटचे मोहोपाडा प्रवेशव्दाराजवल वाटप करण्यात आले.

यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी,खालापूर तालुका सचिव अभिजित घरत,वासांबे पं. स.अध्यक्ष फुलचंद लोंढे,मोहोपडा शहर उपाध्यक्ष संदीप साळुंखे,जेष्ठ महाराष्ट्र सैनिक भालचंद्र बाबारे,वावेघर शाखा अध्यक्ष रशीद शेख,विशाल निंबाळकरव इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.