Press "Enter" to skip to content

सारडे येथील महिलांनी वृक्षारोपणाचा आदर्श ठेवला सर्वांसमोर

सिटी बेल | उरण | रोहित पाटील |

पर्यावरण संवर्धन ही ही काळाची गरज आहे हे सर्वाना परिचित आहे परंतु महिलांनी घेतलेला पुढाकार हा त्याहून श्रेष्ठ होय महिला फक्त चूल आणि मुलं न राहाता निसर्गाच्या रक्षणासाठी आपला सहभाग किंवा आपण काय करू शकतो याचा आदर्श यांनी सर्वांसमोर ठेवला
सारडे येथील चंदनआली च्या महिला तर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे एक कुटूंब एक झाड या सारडे विकास मंच च्या उपक्रमा अंतर्गत आज वृक्षारोपण करण्यात आले. फक्त वृक्षारोपण करून या महिला न थांबता संकल्प केला की आम्ही लावलेली झाडे जगविण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि झाडा सभोवताली असलेला केरकचरा व प्रसंगी झाडांना पाणी देऊ असा अनोखा संकल्प केला.

या प्रसंगी नम्रता म्हात्रे,देवयानी म्हात्रे, रुपाली म्हात्रे, भारती म्हात्रे,सुनंदा पाटील,देवकुबाई म्हात्रे महिलांनी आदर्श घ्यावा आस कार्य आज करण्यात आलं
निसर्ग सवर्धन आणि काळाची गरज आणि कोरोना कालावधीत ऑक्सिजनचा तुटवडा या सर्वावर सुंदर उपाय म्हणून या माहिलानी आपल्या कुटूंबाच एक झाड लावलं आहे आशा प्रकारे सारडे येथील चंदनआली च्या महिला तर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे एक कुटूंब एक झाड या सारडे विकास मंच तसेच सर्वाना समोर आदर्श ठेवला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.