सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत मधील जुने शिवशंभो युवा हायकर्स संस्थेच्यावतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निसर्गाचा समतोल राखणारी व औषधी रोपटयांची लागवड यावेळी करण्यात आली.

संस्थेचे धडाडीचे सदस्य व मार्गदर्शक कै. दिलीप भाई खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन आजच्या वृक्षलागवडीची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मार्गदर्शक मंडळ पदाधिकारी राजाभाऊ कोठारी, अध्यक्ष विकास चित्ते,उपाध्यक्ष महेंद्र कर्वे, दिलीप कदम, ऋषिकेश दानवे,भावेश ठक्कर, सुधांशु वनगे, गौरव चित्ते, तुषार दिवेकर, अमोल मानकामे, सुमित गुरव, राजू दांडेकर,अमित खंडागळे,राजेश घेवारे, दिलीप सावंत,मनिष यादव उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने टेकडीवर बारा कडुनिंब व एक पिंपळ रोपटे यांची लागवड करण्यात आली.ही सर्व रोपटी जगवण्याची जबाबदारी सदस्यांनी घेतली आहे.








Be First to Comment