सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
अलिबाग तालुक्यातील चौल, रेवदंडा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. वाढती कोरोना रुग्ण संख्या बघता तालुक्यातील चौल, रेवदंडा गावांना खबरदारी म्हणून कंटेन्मेंट झोन असताना ही चौल, रेवदंडा गावानमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या पहायला मिळत आहे.
स्थानिकांनी काही प्रमाणात नियमांचे पालन केलेले दिसत आहे. मात्र गावातील नागरिकांबरोबरच बाहेरून येणाऱ्या नागरिकांना चौल, रेवदंडा हद्दीत प्रवेश नसताना ही अनेक जण प्रवेश करताना दिसत आहेत चौल नाका परिसरात प्रशासनातर्फे चोख पोलिसबंदोबस्त असून येणाऱ्या वाहनाची कसून तपासणी केली जात असून, कंटेन्मेंट झोन येथील विभाग असताना तसेच बाहेरील नागरिकांनी प्रवेश करू नये असे फलक असताना नियमांनचे उल्लंघन करण्याऱ्या नागरिकांनावर करवाई केली जात आहे.
स्थानिक प्रशासना तर्फे ही
विनाकारण बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक करवाई स्थानिक प्रशासनातर्फे केली जात असून आत्ता पर्यत अनेकांवर करवाई केली असून कंटेन्मेंट झोन
घोषित केल्या पासून अर्थात दोन दिवसात ३००० रु दंड वसूल करण्यात आला आहे. तेव्हा परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगा विनाकारण बाहेर जाऊ नका अन्यथा करवाईला सामोरे जावे लागणार. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी ही शासनाचा पुढील आदेश येई पर्यत चौल, रेवदंडा गावांन मध्ये शक्यतो प्रवेश करू नकाच.








Be First to Comment