आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक संकेत भासे ह्यांचा पुढाकार
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज जन्मदिवस. दिवसाचं औचित्य साधून कर्जत-खालापूर विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोना काळात ऑक्सिजनचा भासलेला तुटवडा लक्षात घेता वृक्ष संवर्धन आणि लागवड करणे गरजेचे आहे.कर्जत हे हिरव्यागार नवलाईने नटलेलं निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं छोटंसं शहर आहे. त्यामुळे कर्जतचं सौंदर्य अबाधित ठेवून नंदनवन बनवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत.पर्यटनाच्या दृष्टीने कर्जत शहराला विशेष महत्व प्राप्त असल्याने कर्जतच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्यांचं संवर्धन करा असे आवाहन आज शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी एकता नगर दहिवली येथील रहिवासी आणि सामाजिक कार्याची आवड असणारा तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करून संवर्धनाची शपथ सर्वांनी घेतली. सदर ठिकाणी
शिवसेना पदाधिकारी पंकज पाटील, युवासेना उप तालुका अधिकारी प्रसाद थोरवे, माजी उप शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, शिवसेना उप विभागप्रमुख दहिवली विशाल बैलमारे,अजय सुवरणे, उदय जाधव, हर्षद जाधव, वैभव खोपडे, विशाल खोपडे, प्रणित सपकाळ, विनायक गायकवाड, स्वप्नील शाहू ,चेतन देशमुख,अतुल बोराडे,रोहित जाधव,अनिकेत कारांडे, प्रवीण बिबवे, ऋषिकेश जाधव,योगेश पवार,रोहन नागोठकर आदी उपस्थित होते.








Be First to Comment