Press "Enter" to skip to content

सर्पमित्र प्रणय जाधव ने दिले धामण सापाला जीवदान

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील वाघेश्वर नगर रोठ खु.येथील रहिवासी असलेल्या सर्पमित्र प्रणय जाधव याने सापांना जीवदान देण्याचा धडाका लावला असून दोनच दिवसांपूर्वी त्याने रोहे कोर्टाच्या बाथरूममध्ये दडून बसलेल्या आठ फुटी
बिनविषारी धामण सापास जीवदान दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गेल्या पंधरा ते वीस दिवसात त्याने आतापर्यंत विषारी व बिनविषारी असे एकूण दहा सापांना पकडून जीवदान दिले आहे. तर रोहे कोर्टाच्या बाथरूममध्ये साप असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र प्रणय याने तिथे जाऊन मोठ्या शिताफीने आठ फुटी धामण सापास जीवदान दिले.

कोर्टाच्या बाथरूममध्ये साप असल्याचे कोणीतरी पाहिल्याने तेथे उपस्थितीतांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती. अखेर प्रणय याने तिथे जाऊन मोठ्या शिताफीने अडगळीत असलेल्या आठ फुटी धामणीस कोणतीही इजा न पोहचा चलाखीने पकडल्याने व पकडलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा आहे असे त्याने सांगताच उपस्थितीतांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.व प्रणयच्या या धाडसाचे सा-यांनी तोंडभरून कौतूक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.