सिटी बेल | खांब-ऱोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील रोठ खु.ग्रा.पंचायचीचे वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन
सदर व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. तर
कोकणासह रायगड जिल्ह्याची चक्रीवादळामुळे झालेली
पर्यावरणाची हानी पाहता आणि कोरोना विषाणुसोबत सामना करत असताना भासत असलेला ऑक्सीजनचा तूटवडा पाहता आ.अनिकेत भाई तटकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दिनांक १० जून २०२१ रोजी रोठ खु. ग्रामपंचायतीने वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला सरपंच गीता मोरे,उपसरपंच महेंद्र कांबळे,सदस्य सचिन मोरे,जनार्दन मोरे,राकेश मोरे, हर्षाली कांबळे,मंगेश मोरे,अमोल ढमाळे,प्रकाश डाके आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमातंर्गत ग्रा. पंचायत परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली असून त्या सर्व रोपांची व्यवस्थितपणे निगा राखून संगोपन केले जाईल.व भविष्यात देखील व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही कटिबद्ध राहणार असल्याचे सरपंच गीता मोरे यांनी याबाबत अधिक माहिती देताना पत्रकारांना सांगितले.








Be First to Comment