सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील मुठवली बु.गावचे रहिवासी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव विठ्ठल कापसे यांचे राहत्या घरी वयाच्या ८२ व्या वर्षी व्रुद्धपकाळाने दु:खद निधन झाले.ते तालुका आयुर्विमा प्रतिनिधी जनार्दन कापसे यांचे वडील होत.
गावातील प्रत्येक उपक्रमात स्वत:हून सहभागी होऊन सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे महादेव कापसे हे स्वभावाने नम्र व शांतव्रुत्तीचे होते.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच त्यांचे आप्तस्वकीय व मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.सध्याच्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीचे पालन करून त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,मुलगी, सुना, जावई,नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी गुरुवार दि.१७ जून रोजी तर अंतिम धार्मिकविधी रवि.दि.२० जून रोजी मुठवली येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment