Press "Enter" to skip to content

मेढे ग्रामपंचायतीचे वतीने व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | खांब-ऱोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील आदर्श ग्रा. पंचायत म्हणून नावाजलेल्या मेढे ग्रा. पंचायचीचे वतीने व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन कोकणासह रायगड जिल्ह्याची चक्रीवादळामुळे झालेली पर्यावरणाची हानी पाहता आणि कोरोना विषाणुसोबत सामना करत असताना भासत असलेला ऑक्सीजनचा तूटवडा पाहता आ.अनिकेत भाई तटकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मेढा ग्रामपंचायतीने वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला.
   

सदर कार्यक्रमाला पं.समिती मा. सभापती लक्ष्मण महाले , राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष महेंद्र खैरे , उपसरपंच उदय मोरे , सदस्य रवींद्र जाधव ,सदस्यां श्रेजल उंबरे,शेवंती शिद ,नथुराम महाले,चंद्रकांत गोवर्धने, शुभम उंबरे ,नरेश शिद, विजय मोरे , छगन लाड आदी मान्यवरांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमातंर्गत ग्रा. पंचायत परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली असून त्या सर्व रोपांचे व्यवस्थितपणे संगोपन केले जाऊन सर्व रोपांचे सर्वांचे सहकार्याने मोठ्या झाडांमध्ये रूपांतर केले जाईल.अशाप्रकारची प्रतिक्रिया मा.सभापती लक्षण यहाले यांनी पत्रकारांना दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.