सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील पुई ग्रा.पंचायतीचे पहिले सरपंच होण्याचा बहुमान प्राप्त करून गावाच्या विकासकामांसाठी बहुमोल योगदान देणारे माजी सरपंच विठोबा सखाराम दिसले यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी वयाच्या ८५ व्या वर्षी दु:खद निधन झाले.
रायगड जिल्ह्याचे खा.सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय व अत्यंत विश्वासू असणारे विठोबा दिसले यांनी आपल्या हयातीत राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता.तर समाज व गावाचा विकास हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय बाळगले होते.महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी ग्रा.पंचायतीला तंटामुक्त गाव हा बहुमानाचा पुरस्कार देखील मिळवून दिला होता.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजतात त्यांचे जवळचे आप्तस्वकीय व मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.कोरोना नियमावलीचे पालन करून त्यांचे अंंत्यविधी पार पाडण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,सुन,मुली,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोम.दि.१४ जून तर अंतिम धार्मिकविधी तेरावे गुरुवार १७ जून रोजी पुई येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment