सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
संपूर्ण जगभरात रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्राचे नाव आहे मात्र याच औद्योगिक क्षेत्रातील मान्सूचे तसेच क्षेत्रातील सांड पाणी वाहून जाणाऱ्या गटारांची कामे काही कोटी रुपयांची ईटेंडरिंग द्वारे ठेकेदाराने घेतली मागील दीड दोन वर्षांपासून अंतर्गत पाईपलाईन आणि सदरच्या गटारांच्या कामांची खोदाई ठेकेदाराने करून पाईपलाईन व गटारांच्या कामांना सुरवात केली मात्र काही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने भर पावसात आता नागरिकांच्या जीवावर वेतत आपघाला निमंत्रण देणारी ठरत असल्याचे दिसून येत आहे .
सदर याविषयी सविस्तर माहिती अशी की, रोहा धाटाव एमआयडीसी हद्दीतील नाल्यांच्या कामासाठी व पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते बेतलेत आता नागरिकांच्या जीवावर. त्यामुळे आपघातांचा धोका वाढला असून काही ठिकाणी चक्क ठेकेदाराने मलमपट्टी लावून सोडली आहे. गटार कामासठी व पाईपलाईन साठी काही ठिकाणी रस्ता खोदून त्या ठिकाणी पाईप गाडले तर काही ठिकाणी मोऱ्या बांधण्यात आल्या परंतु रस्ता खोदल्याने त्या दोन्ही बाजूस मोठं मोठे खड्डे झाले आहेत.
त्यावर संबधित ठेकेदाराने केवळ हागावर माती लकटावी अशी खडी पसरवून ठेवली तसेच खोदलेली माती पावसाळ्यात चिकट झाल्याने रस्त्यासभर पसरलयाने औद्योगिक क्षेत्रात कामावर येणारा बहुसंख्ये कामगारांना मोठा आपघातांचा धोका निर्माण झाला आहे. कामावर येणारे कामगार हे तिन्ही शिफ्ट मध्ये येणारे असतात. त्यात सुरू असलेला धो धो पाऊस यात ही चिकट झालेली माती त्यांच्या अपघाताला कारणीभूत ठरत मोठा अनर्थ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोलाड रोहा मार्गाला जोडला गेलेला दुसरा मार्ग सुदर्शन फाईनसॅक अंथया आरडीसी कडे जाणारा हा मार्ग आहे आणि त्या मार्गात खोदाई केलेल्या गटारांची कामे देखील दिरंगाई अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे .
तरी संबधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणी आपघात टाळण्याकरिता उपाय योजना करावी अशी मागणी कामगार वर्गातून केली जात आहे .








Be First to Comment