सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
सदैव सफाईत गुंतलेल्या सफाई कामगारांनी तौक्ते चक्रिवादळानंतर वाढलेल काम देखील तत्परतेने करत खालापूर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे दिलासा फाऊंडेशन कडून कौतुक करण्यात आले असून शुक्रवारी स्वच्छतादूताना छत्री वाटप करण्यात आले.
खालापूर नगरपंचायतीने पाच वर्षापासून स्वच्छ खालापूर सुंदर खालापूर ब्रीद वाक्य घेत स्वच्छतेचा वसा जपला आहे.यामध्ये मोलाचा वाटा सफाई कामगार म्हणून राबणा-या हाताचा आहे.खालापूर नगरपंचायत हद्दीत महड सारखे तीर्थक्षेञ असल्याने स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविले जाते.तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा खालापूरात देखील जाणवला होता.तुटलेल्या झाडांच्या फांद्या आणि मोठ्या प्रमाणात पालापाचोळ्याचे ढिग खालापूर शहरात ठिकठिकाणी जमा झाले होते.शहरातून जवळपास अतिरिक्त एक टन कचरा सफाई कामगारानी जमा केला.पंचवीस सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीचे दखल दिलासा फाऊंडेशन खालापूरने घेत शुक्रवारी छत्री वाटप केले.
या सत्कार प्रसंगी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे, खालापूर नगरपंचायत प्रथम नगराध्यक्षा शिवानी जंगम, पोलीस निरीक्षक अनिल विभुते ,खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष संतोष जंगम , ज्येष्ठ नेते विजय पाटील, खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका प्रिया जाधव, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण जाधव सचिन कळमकर ,शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उमेश विचारे सह सर्व स्वच्छतादूत उपस्थित होते.











Be First to Comment