सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील गोवे गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.विलास रामा पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्षाचे होते.ते शांत व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होते.ते रोहा तालुका वारकरी संप्रदायांचे खजिनदार, कोलाड विभागीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष,गोवे गावाकमेटीचे अध्यक्ष,बाल्या नाचाचे गायक,व तरुणाचे श्रद्धास्थान, तसेच सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रात नेहमी सक्रिय होते.
तसेच वारकरी संप्रदायांच्या दिंडीचे अन्नदाते होते.तर संभे ते आळंदी पायी दिंडी सोहळ्यात त्यांचा सहभाग होता.अशा विविध सामाजिक कार्यात सक्रिय असणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह गोवे गाव व रोहा तालुक्यातील वारकरी संप्रदायावर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे.त्यांच्या अंत्यविधीसाठी सोशल डिस्टन्सचा पालन करीत मोजकेच नागरिक उपस्थित होते परंतु त्यांना रोहा तालुका वारकरी संप्रदाय व कोलाड विभागीय वारकरी संप्रदाय तसेच विविध क्षेत्रातील असंख्य नागरिक यांच्या कडून मोबाईलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, बहीण, नातवंडे व मोठा पवार कुटुंब आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.१८ जून व उत्तर कार्य विधी रविवार दि.२० जून २०२१ रोजी त्यांच्या गोवे येथील निवासस्थानी होणार आहेत.








Be First to Comment