Press "Enter" to skip to content

कर्जत-खालापूर तालुक्यातील धबधब्यावर फिरायला जाण्यास बंदी

काल पासून दोन महिन्यासाठी बंदी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

मुंबई – पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत – खालापूर तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे त्यामुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक कर्जत -खालापूर तालुक्यातील धबधब्यावर फिरायला – मजा करायला येत असतात. पण मौज मजा करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा प्रादुभाव सुरू आहे, या बाबींचा विचार करून कर्जत – खालापूर या दोन तालुक्यातील धबधब्यावर व धरणावर दोन महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

कर्जत तालुक्यातील आषाणे – कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण, पाझर तलाव, पळसदरी धरण, कोंढाणे धरण, धबधबा, पाली -भुतिवली धरण, नेरळ जुम्मापट्टी धबधबा,बेडीसगाव धबधबा, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा, वदप धबधबा, मोहिली धबधबा, दहिवली नदी परिसर, डोंगरपाडा धरण, कोमलवाडी धबधबा, खांडस धरण, अवसरे धरण, साळोख धरण, कोल्हारे नदी परिसर.

खालापूर तालुक्यातील झेनित धबधबा, आडोशी धबधबा व परिसर, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाळ/ भरोसे धरण, वावरले धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, धामणी कातकरवाडी धरण, कलोते धरण.

या धबधब्यावर व धरणावर शनिवार रविवार पर्यटकांचा महापूर येत असतो. तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभल्याने या मध्ये भिजण्याचा मोह आवरत नाही. मागील दोन तीन वर्षात तालुक्यात पर्यटकाचा महापूर वाढला आहे. पर्यटक मौज मजा करायच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. मागील दोन वर्षात झालेल्या घटना पाहता कर्जत पोलीस ठाणे, नेरळ पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे, खोपोली पोलीस ठाणे यांनी झालेल्या घटनाचा आहवाल तहसील कार्यालयात पाठवला. हा अहवाल प्रांत कार्यालया आला होता. झालेल्या घटना समोर ठेवून दोन्ही तालुक्यातील धबधबे आणि तलाव या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे. प्रतिबंधात्मक आदेश बुधवार दि. 9 जून पासून 8 ऑगस्ट 2021 म्हणजे दोन महिन्यासाठी लागू केला आहे अशी माहिती प्रांत वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.