सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
नगर पंचायत हद्दीत पावसापूर्वी कामाला वेग आला असून शहरातील मुख्य नाल्याची सफाई स्वतः मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे लक्ष देऊन करून घेत आहेत. शहरातून वाहत पातळगंगा नदीला मिळणाऱ्या ओढ्याची पावसाळ्या पूर्वीची करावयाची गाळ साफसफाई रखडली होती.
शहराच्या मध्यभागातून लोकवस्ती नजीक हा ओढा वाहत असून ओढ्यातील पाणी आजूबाजूच्या शेतात तसेच आसपासच्या घरात शिरते. त्यामुळे ओढ्याची तातडीने सफाई ची मागणी नागरिक करत होते. नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून सफाईचे काम तातडीने हाती घेतले आहे जेसीबीच्या साह्याने ओढ्यातील गाळ आणि जलपर्णी काढण्यात येत असून रुंदीकरण देखील करण्यात येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ओढा सफाईसाठी टेंडर काढण्यात आले होते परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता जिल्हाधिकारी मॅडम यांनी देखील पावसा पूर्वीचे नालेसफाई कामे तातडीने करून घेण्याचे आदेश दिल्याने नगरपंचायतीने सफाईचे काम हाती घेतले असून मोठ्या प्रमाणात माती आणि जलपर्णी काढण्यात येतआहे.
सुरेखा भणगे शिंदे- मुख्याधिकारी खालापूर नगरपंचायत








Be First to Comment