बुद्धिबळ परिचय कार्यक्रमाचे आयोजन
सिटी बेल/नवीन पनवेल. श्रीनिवास काजरेकर
क्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘क्रीडाराधना’ या समूहाच्या वतीने नुकतेच बुद्धिबळ परिचय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. गुगल मीट आणि फेसबुक लाईव्ह वर हा कार्यक्रम संपन्न झाला. यामधे चॅलेंजर चेस अॅकॅडमी, मुंबईचे अध्यक्ष शरद वझे यानी मार्गदर्शन केले. शरद वझे हे पहिल्या जागतिक ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे टेबल डिरेक्टर तसेच १६५ स्पर्धकांबरोबर सलग १२ तास बुद्धिबळ खेळून लिम्का बुकमधे नोंद करणारे प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहेत.
ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने क्रीडाराधना या समूहाची निर्मिती करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून विविध क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या समूहाच्या समन्वयक मंजुषा भावे, मुग्धा अंबेकर
तसेच युवोन्मेष समूहाचे शार्दूल दामले, संकेत आराध्ये, देवेश पेंडसे आदी युवकानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. राज्यभरातील बुद्धिबळप्रेमीनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.







Be First to Comment