सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापनदिन संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवून साजरा केला. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशाने तसेच रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाने नागोठणे शहर व विभागातील कार्यकर्त्यांनी सकाळी ठीक १०:१० वाजता नागोठणे येथील आंबा घाट येथे विविध झाडांचे वृक्षारोपण करून आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
दरम्यान भविष्यात मानवजातीला ऑक्सिजनची कमतरता भासू नये या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करावे असे आवाहन आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केले होते त्या अनुषंगाने नागोठणे शहर व नागोठणे हिभागातील कार्यकर्त्यांनीही आपल्या परिसरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून वर्धापदिन साजरा केला.
नागोठणे येथील अंबा घाटावर वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, बाळासाहेब टके, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, पळसचे माजी सरपंच हिराजी शिंदे, विक्रांत घासे, युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, दिपेंद्र अवाद, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, अतुल काळे, रोहा तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष पप्पूशेठ अधिकारी, युवा नेते रोशन पारंगे, नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग, बिपीन सोष्टे, मनोज टके, रोहिदास हातनोलकर, विध्यार्थी संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, केतन भोय, उमेर सांगडे, नरेश जैन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment