Press "Enter" to skip to content

कॅन्सरग्रस्त ऋचिता माळी हिस आर्थिक मदतीचे आवाहन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठण्याजवळील वरवठणे(ता.रोहा) या गावातील कु. ऋचिता माळी हिस कँसर झाला असून तीचे वडील संतोष माळी यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे दानशूर व्यक्तिमत्वांनी त्यांना आर्थिक मदत करावी असे आवाहन संतोष माळी कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

कु. ऋचिता संतोष माळी ही इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे. सदरची मुलगी ही आपले शिक्षण घेताघेता गेली दोन वर्षापासून कबड्डीच्या माध्यमातून नाव लौकिक मिळवित असताना अचानक तीचा भाऊ संकेत माळी हा मुंबई या ठिकाणी कामावर जात असताना गडब तालुका पेण येथे अपघात जखमी झाला. त्यानंतर संकेत बरा होतो ना होतो त्याचवेळी ऋचिता आजारी पडली. त्यात ऋचिता हिस कँसर असल्याचे निदान झाले.

ऋचिताचे वडील संतोष माळी हे रोजंदारीने कामाला जातात त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती हलाकीची आहे. के.ई.एम.मुंबई येथील हाॕस्पिटलमध्ये ऋचीता माळी हीच्या उपचारासाठी चार लाख रुपयांची आवश्यकता आहे. गेले तीन ते चार महिन्यापासून ऋचीताचा भाऊ, आई व वडील हे हाॕस्पिटलमध्येच असल्यामुळे उपचारासाठी पैसे आणणार तरी कोठून. कु. ऋचिताच्या उपचारासाठी आर्थिक स्वरूपात मदतीची आवश्यकता असून दानशूर व्यक्तिमत्वांनी मदतीसाठी संतोष माळी ( मो. नं. 9370832230 ) व संकेत माळी ( मो. नं. 9619431412) आदींना संपर्क साधावा किंवा संतोष पांडुरंग माळी बँक आँफ बडोदा-खाता नंबर -99890100010729 ( IFSC CODE NO- 402012511) या बँकेच्या खात्यात पैसे जमा करून आम्हास सहकार्य करावे असे आवाहन संतोष माळी कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.