Press "Enter" to skip to content

उद्योजक स्व.सोपानशेठ मेहर यांच्या स्मरणार्थ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

मुंबई-वाशीच्या बाजारपेठेतील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सोपानशेठ रामभाऊ मेहर यांचे 9 जून 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विशालशेठ मेहर यांनी आज अंतोरे ग्रामपंचायत हद्दितील गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, माझ्या वडीलांना समाजसेवेची खुप आवड होती त्यांनी अनेकदा गरजूंना मदत केली आहे. ज्या लोकांना काशी तिर्थक्षेत्रासाठी जाता येत नाही अशा गरजूंसाठी त्यांनी सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत तिर्थक्षेत्रांचे दर्शन घडविले आहे.मात्र त्यांच्यावर कोरोनाचे सावट आले आणि ते आमच्यातून निघून गेले आहेत पण त्यांच्या सामाजिक सेवेचा वसा आम्ही सातत्याने जोपासणार असल्याने स्वर्गीय सोपानशेठ मेहर यांच्या स्मरणार्थ आज अंतोरे येथे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे या करीता आम्हाला येथील रहिवासी सुरेशशेठ पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी अंतोरे ग्रामपंचायत सरपंच अमित पाटील, सदस्य राजेश कांबळे, हिराबाई पाटील, आशा म्हात्रे, ग्रामसेवक प्रविण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील, दत्तात्रेय सुर्यवंशी, संकल्प चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष राजेश म्हात्रे आदि मान्यवरांच्या हस्ते यावेळी गरजूंना वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल विशालशेठ मेहर यांना ग्रामपंचायतीच्या वतीने आभार पत्र देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.