Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीवर आदीवासीबांधवांचा एल्गार

मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा निर्धार

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगरवाडी,शिंदीवाडी, तळेगाववाडी, पानशिलवाडी तसेच श्रमजीवी संघटनाचेच्या सहकार्याने आदीवासी बांधवांनी मोर्चा काढून घोषणाबाजी करत विविध मागण्या केल्या.या मागण्यांची ग्रामपंचायतीकडून पुर्तंता न झाल्यास उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.

श्रमजीवी संघटनेच्या सहकार्याने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी बांधवांनी मोर्चा काढून ग्रामपंचायतीबाहेर घोषणाबाजी केली.

यावेळी कोरोना पाश्र्वभूमीवर नियम पाळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात मोजक्या आदीवासी बांधवांना घेऊन चर्चा करण्यात आली.यावेली आदीवासी बांधवांनी समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी खावटी अनुदान योजना 2020 शासन निर्णंयाची अंमलबजावणी करुन दोन हजार रुपयांचे जिवनावश्यक वस्तू आदीवासी लाभार्थ्यांना न मिळणे, मंजूर लाभार्थ्यांना बॅंक खात्यावर जमा न झालेले दोन हजार रुपये जमा होण्यास का विलंब असं प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कमिटीने समाधानकारक उत्तर देवून आदीवासी बांधवांना शिल्लक अनुदान एक महिन्याच्या कालावधीत जमा होईल असे आश्वासन देण्यात आले.

शिवनगरवाडी पाणीसमस्या,शिंदीवाडी पाणी समस्या, तळेगाववाडी पाणी समस्या, घरकुल योजना तसेच रस्ता आदी समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी आदीवासी बांधवांच्या बाजूने स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड यांनीही आदीवासींना त्यांचा हक्क द्यायलाच पाहिजे अशी मागणी केली.

याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आदीवासी बांधवांनी घोषणाबाजी करीत मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच ताईं पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी सुधीर तोंडलेकर,माजी सरपंच संदिप मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे,संतोष मैदर्गींकर, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड,बाबू वाघमारे ,भिम पवार, सुरेखा पवार,अशोक पवार,अनंता वाघे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.