सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कृषि विभाग योजनेअंतर्गत बारवईं ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बारवई आदिवासीवाडीतील आदीवासी बांधवांना कृषी अधिकाऱ्यांकडून नाचणी बियाणे,तुर बियाणे, काळा भात बियाणे, लाल भात बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच अॅड नियती बाबरे ,उषा वाघमारे, ग्राम पंचायत सदस्य तसेच कृषि विभागाच्या अधिकारी संगिता सुरेश पाटील,कृषि सहाय्यक यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.ऐन पावसाळ्यात आदीवासी बांधवांना विविध प्रकारची बियाणे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.









Be First to Comment