सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
वडगाव जिल्हा परिषद हद्दीतील मौजे तांबाटी येथील ग्रामस्थांनी जि.प.सेस फंडातुन गणेश घाट बांधकाम करण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्याकडे मागणी केली होती.नागरिकांची समस्या लक्षात घेत सुरेश पाटील यांनी तात्काळ आपली पत्नी जि.प.सदस्या पद्मा पाटील यांच्या जिल्हा परिषद सेस फंडातुन या कामासाठी पाठपुरावा करुन ६ लक्ष निधी उपलब्ध करुन काम मंजूर करून घेतल. त्या कामाचे उदघाटन जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या हस्ते मंगळवारी श्रीफळ वाढवून करण्यात आले.
त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुरेश पाटील, तांबाटी ग्रामपंचायत उपसरपंच सारिका राकेश लाड,ग्रामपंचायत सदस्या संगिता संतोष मेंगाल, विश्वनाथ मारुती पाटील(वाशिवली), संदीप शंकर पाटील(बोरिवली),वडगाव ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील, जेष्ठ नागरिक प्रभाकर चिंधू पाटील,रमेश बाळकृष्ण म्हामुणकर,सामजिक कार्यकर्ते विकास वामन मुंढे,राकेश राजन लाड,विश्वास चंद्रकांत पाटील,हरेश चव्हाण,बिपिन भोसले, सावरोली पंचायत समिती वार्ड युवा अध्यक्ष तुषार मुंढे,सचिन गणु पाटील,साक्षी पाटील,ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच सारिका राकेश लाड यांनी गणेशघाटा करिता निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांचे आभार मानले.








Be First to Comment