Press "Enter" to skip to content

प्रशांत खाने यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाली

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

एकिकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट.या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.त्यातच प्रत्येकाची स्थिती उत्तम असते असे नाही.ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब कुटूंबाना हक्काचा आधार देणारे रसायनी तील खाने आंबिवली गावचे जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत खाने यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील मोठा आनंदाचा दिवस, प्रत्येक जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.परंतु कोरोना पाश्र्वभूमीवर वाढदिवस थाटामाटात न करता रसायनी तील भुमिपुत्र प्रशांत खाने यांनी विविध उपक्रम राबवून साधेपणाने साजरा केला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा येथील शिवभोजन केंद्रावर जवलपास तीनशे गरजू गोरगरीबांना मोफत शिवभोजन थाली वाटप करण्यात आल्या.वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रत्येकाची भूक मात्र शांत झाली याचेच प्रशांत खाने यांना समाधान मिळाले.तर परिसरातील काही गरजूंना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवभोजन थाली केंद्रावर माजी उपसरपंच अशोक मुंढे,काॅग्रेस आयचे तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे, मानवाधिकार संघटनेचे देवेंद्र पाटील,सागर सुखदरे,अजय म्हस्कर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.