सिटी बेल | मेढे | उदय मोरे |
मेढे ग्रु.ग्रा.पंचायतीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिव स्वराज्य दिन नवनिर्वाचित उपसरपंच तथा जेष्ठ पत्रकार रायगड भूषण उदय मोरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला.
शासन आदेशान्वये संपन्न करण्यात आलेल्या या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याची शान असणाऱ्या भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यात आली. तद्नंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त सेल टँक्स अधिकारी रघुनाथ मोहिते, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेंद्र खैरे,सदस्य रविंद्र जाधव,सदस्या श्रेजल उंबरे,नम्रता महाले,ज्ञानेश्वरी गोवर्धने,माजी सरपंच संतोष सुतार, ग्रा.सेवक अमोल तांबडे, राष्ट्रवादी विद्यार्थी युवक संघटनेचे शुभम उंबरे,नथुराम महाले,दिनेश घरट,छगन लाड,अनिकेत उंबरे,रागिणी गोवर्धने आदींसह मोठ्या संख्येने ग्रा.पं.हद्दीतील रहिवासी उपस्थित होते.








Be First to Comment