Press "Enter" to skip to content

महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने विद्युत समस्येबाबत दिले निवेदन

सिटी बेल | खांब-रोहा | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील आंबेवाडी येथील रहिवासी वर्गाला भेडसावत असलेल्या विद्युत समस्यांबाबत तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने कोलाड
राज्य विद्युत वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले आहे.

दिवसेंदिवस कोलाड-आंबेवाडी-वरसगाव नाक्याचे नागरिकीकरण व शहरीकरण वाढत चालले असल्याने विद्युत समस्यांचाही सामना येथील रहिवासी वर्गाला करावा लागत आहे. वाढत्या विद्युत समस्यांबाबत विद्युत मंडळाचे कर्मचारी देखील त्वरीत निराकरण करून दखलही घेत आहेत. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे समस्याही उद्धभवत असताना त्याचा त्रास मात्र येथील रहिवासी वर्गाला सोसावा लागत आहे.

येथील समस्या तसेच श्री.स्वामी समर्थ मंडळ आंबेवाडी येथील ट्रान्सफार्म ड्रिस्ट्रीब्यूशन ऊघडा असलेला दरवाजा
यामुळे कोणत्याही क्षणी एखादा मोठा अपघात होऊ शकतो याबाबतची समस्या निदर्शनास येताच तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांनी उपअभियंता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नितिन जोशी यांना याबाबत निवेदन देऊन त्वरित कार्यवाही करण्यासाठीचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.यावेळी.पं.सदस्य कुमार लोखंडे, अविनाश पलंगे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वामी समर्थ मंडळ आंबेवाडी येथे मुख्य ठिकाणीच ट्रान्सफार्म ड्रिस्ट्रीब्यूशनच्या उघड्या दरवाजामुळे येथील रहदारीचा विचार करता लहान मुले व मोठ्या माणसांना यापासून होणा-या संभाव्य धोक्याचा विचार करता येथील ट्रान्सफार्म सुरक्षित असणे गरजेचे आहे. ही बाब यावेळी स्पष्ट करुन सांगण्यात आली.तर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन लवकरच ट्रान्सफार्मचा उघडा दरवाजा पुर्ववत करून अन्य समस्याही सोडविल्या जातील अशाप्रकारचे अश्वासन यावेळी उपअभियंता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नितिन जोशी यांनी दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.