सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझल व एलपीजी गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण करून ठेवले आहे. या दरवाढी विरुद्ध कर्जत तालुका कॉंग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने रिलायन्स पेट्रोल पंपा नजीक भरमसाठ पेट्रोल ,डिझेल व एलपीजी गॅसचे दरवाढीच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन व जाहीर निषेध करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, विजय हरिश्चंद्रे, शहराध्यक्ष इरफान अत्तार, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, सुभाष मदन, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग सचिव इस्माईल दिवान, संदीप पाटील, मोहन सुर्वे, गिरीश देशमुख आदींनी मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना मुकेश सुर्वे यांनी, ‘केंद्रातील मोदी सरकारने भरमसाठ इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांचे जगणे मुस्किल करून ठेवले असून या दरवाढीमुळे महागाई सुद्धा वाढली आहे. कोरोनाच्या काळात आधीच कसे जगावे? हा प्रश्न पडला असताना इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो.’ असे स्पष्ट केले. विजय हरिश्चंद्रे यांनीही मनोगतात केंद्र सरकारचा निषेध केला.








Be First to Comment