Press "Enter" to skip to content

खालापूरात शिवराज्याभिषेक दिनी दिव्यांची आरास

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

शहरातील नागरिकांनी शिवराज्याभिषेक दिन दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करित साजरा केला. खालापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला खालापूर परि पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई आणि पोलीस शिपाई विठ्ठल घावस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती पणतीची आरास करण्यात आली होती.

अंधार नाहिसा करण्याची ताकद छोट्याशा पणतीत आहे .छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची किमया करून दाखवली त्यामुळे तरुण पिढीने खचून न जाता ध्येयाकडे वाटचाल करावी असे परी उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई यांनी सांगितले.

खालापूरातील शिवप्रेमी अनिल शिंदे, दत्तात्रय पवार, पुंडलिक पारठे, अथर्व कळमकर,विनोद रायकर, शीतल वाघरे, यश कळमकर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.