पनवेलच्या पत्रकार क्षेत्रात हळहळ व्यक्त : तरूण सहकारी गमावल्याने पत्रकार मित्रांना धक्का
सिटी बेल | पनवेल |
पत्रकार वचन गायकवाड यांचे आज कोरोनाने निधन झाले. अतिशय तरूण वयात असा धडाडीचा सहकारी गमावल्याने पनवेलच्या पत्रकार क्षेत्रात शोकपुर्ण वातावरण आहे.
वचन गायकवाड हे गेले काही दिवस कोरोनाशी झुंज देत होते.त्यांच्यावर कामोठे एम जी एम रूग्णालयात उपचार सुरू असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
वचन गायकवाड हे दैनिक कर्नाळा तसेच सिटी बेल वृत्तसमुहात कार्यरत होते.त्याचप्रमाणे ते न्यु इंग्लिश स्कूल देवीचा पाडा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. इतक्या तरूण वयात त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वचन गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजताच पनवेल तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.








Be First to Comment