तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या माध्यमातून तालुक्यात संजीवनी कृषी सप्ताह दिन
सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव /पाताळगंगा :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या माध्यमातून खरीप हंगामातील नियंत्रित पद्धतीने भात लागवड कसे करावे यांचे प्रात्येक्षिके माडप,कोपरी,पानशिल,वयाल,भिलविले,हातनोली, येथिल असलेले प्रगत शिल शेतकरी यांच्या शेतामध्ये करण्यात आली.यावेळी माडप येथिल शेतकरी हरेश पाटील,कोपरी येथिल रघुनाथ फाटे यांच्या शेतावर संजीवनी कृषी सप्ताह दिनांचे औचित्य नियंत्रित पद्धतीने भात लागवड हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.दिवसेंदिवस भात लागवड कमी होत असतांना शिवाय जमिनीची विभागणी तुकड्यात होत असतांना भात शेती मध्ये घट होत चालली भाताचे उत्पन्न वाढावे या दृष्टीकोणातून खालापूर तालुका कृषी अधिकारी नविन तंत्रज्ञान शेतकरी वर्गापर्यंत पोहचविण्याचे तसेच त्यांचे प्रात्यक्षिके करून दाखवत आहे जणे करून भाताचे उत्पन्न वाढले जाईल.
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते.मात्र आता हे चित्र दिवसेंदिवस बदलत चालले आहे.मात्र जिल्ह्यात भाताचे उत्पन्न वाढले पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुका कृषी अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत असतात.
त्याचबरोबर चारसुत्री हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. शेतीचा बांध हा पडीक न राहता खरीप हंगामात त्याच्यावर सुद्धा काहीतरी लागवड करता या विचारांतून शेताच्या बांधावर तुर लागवड करण्यात आली.त्याच बरोबर त्याचे नफा किती असतो,यांची माहिती देण्यात आली.त्याच बरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना च्या माध्यमातून फळबाग लागवड करण्यास शेतकऱ्यांस आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ,मंडळ कृषी अधिकारी – महेंद्र सालके,कृषी परवेक्षक चौक – नितिन महाडीक,कृषी,साहाय्यक – चेतन चौधरी,
थालकरी त्याच बरोबर शेतकरी वर्ग उपस्थित होते.
Be First to Comment