सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
माजी उपसभापती वसंत काठावले यांच्याहस्ते भाताण येथील स्मशानभूमी व जिल्हा परिषद शालेच्या आवारात विविध जातींच्या जवळपास तिनशेपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी माजी उपसभापती वसंत काठावले, सरपंच सुभाष भोईर आदीं उपस्थित होते. यावेळी वसंत काठावले म्हणाले की ऑक्सीजन चे महत्व आपण शाळेत विज्ञानात शिकलो.पण त्याचे खरे महत्त्व कोरोनाने शिकविले आहे. वृक्षलागवड केल्याने वातावरणात ऑक्सीजन पातळी वाढेल, यासाठी सर्वांनी वृक्षलागवड करावी असे आवाहनही माजी उपसभापती वसंत काठावले यांनी केले.











Be First to Comment