सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पावसाळा जवळ येवू लागला कि मे महिन्यापासूनच मोहोपाड्यातील विज वितरण कार्यालयाकडून पावसाळ्यापुर्वींची कामे सुरू होतात.यावर्षी तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला असतानाही मोहोपाडा रसायनी परिसरातील विजपुरवठा मोहोपाडा विजवितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तारेवरची कसरत करुन विजपुरवठा काही ठिकाणी एक तर काही दोन दिवसांत पुर्वंवत सुरू केला.
मोहोपाडा विजवितरणाचे उपअभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा रसायनी परिसरात पावसाळ्यापुर्वीची कामे जोरात सुरू आहेत.आतापर्यंत विजवितरण हद्दीतील भोकरपाडा, तळेगाव,रिस, कालणवाडी, चांभार्लीं,खाने आंबिवली, शिवनगर रिसवाडी,एम आयडिसी वाॅटर विभाग आदी परिसरातील विजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.तर तळेगाव व आसपासच्या परिसरातील लोंबकळत असलेल्या विज वाहिन्या खेचून व्यवस्थित करण्यात आल्या.तसेच परिसरात झुकलेल्या विजवाहिन्या ट्रान्स्फरची कामे जोमात सुरू असून अंतिम टप्प्यात आल्याचे समजते.








Be First to Comment