Press "Enter" to skip to content

खालापूर नगरपंचायतीने वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन केला साजरा

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

वसुंधरेची पर्यावरण रक्षणाची हरित शपथ तसेच स्मशानभूमी येथे पर्यावरण पूरक पंचवीस वृक्षाची लागवड करून खालापूर नगरपंचायतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. खालापूर नगरपंचायतीने मागील पाच वर्षे वृक्ष चळवळ राबवित शेकडो रोपांची लागवड करित जोपासना केली आहे.

शनिवारी जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. नगर पंचायत कर्मचारी ,अधिकारी यानी एक झाडाची जगविण्याची हमी घेतली असून त्याचे रक्षण वैयक्तिक पातळीवर करणार असून एक चांगला निर्णय असल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

  स्मशानभूमीत वृक्षारोपण करताना नगरपंचायत मुख्याधिकारी व कर्मचारी तसेच हरित शपथ घेताना.

यावेळी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक आम्ही खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, नगरपंचायतीचे अधिकारी त्र्यंबक देशमुख, सुरेश पोसतांडेल, सोनू पाटील, सुवर्णा जगताप ,नगर अभियंता मोरखंडीकर, तुषार धाडवे,सुधीर गायकवाड, अनिल गायकवाड व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.